वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदासाठी उत्सुक असणारे वादग्रस्त उमेदवार आणि प्रसिद्ध उद्योजक डोनाल्ड ट्रम्प यांनी आता स्वतःची तुलना चक्क महात्मा गांधींसोबत केली आहे. यासंबंधीची एक पोस्ट त्यांनी ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर टाकली आहे.
त्यांनी टाकलेल्या एका फोटोमध्ये त्यांच्या सभेत असलेली गर्दी आहे. त्याखाली लिहिलेल्या एका घोषणेत 'पहिल्यांदा ते तुम्हाला दुर्लक्षित करतात, नंतर ते तुमच्यावर हसतात, नंतर ते तुमच्याशी लढाई करतात आणि मग तुम्ही जिंकता - महात्मा गांधी' असे लिहिले आहे.
#Trump2016 #TrumpInstagram: https://t.co/tzHtny48nQ pic.twitter.com/BpKZcISeKi
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 29, 2016
अमेरिकी माध्यमांनी मात्र त्यांच्यावर टीका केली आहे. अशाप्रकारचे कोणतेही वाक्य महात्मा गांधींनी उच्चारले असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत असे त्यांचे मत आहे. तर हे वाक्य समाजवादी नेते निकोलस क्लेन यांचे आहे. ट्रम्प हे त्यांच्या मुस्लिमविरोधी विधानांसाठी नेहमी चर्चेत राहिले आहेत.