ओस्लो : नार्वेची राजधानी ओस्लोमध्ये एक शानदार सोहळ्यात भारताचे बाल अधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजईला नोबेलचा शांततेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
नोबेल पुरस्कार कमेटीचे चेअरमन थोरबजॉर्न जागलँड त्यांना सन्मानित केलं.
भारतातील बालपण वाचवा आंदोलनाचे संस्थापक कैलाश सत्यार्थीने आपल्या भाषणात सांगितलं, त्यांचा जीवनाचा उद्देश प्रत्येक मुलाला मुक्त करण्याचं आहे.
कैलाश सत्यार्थी म्हणाले, प्रत्येक मुलाला मोठं होण्याचा आणि पुढे जाण्याचा अधिकार आहे, आपल्या मर्जीने त्याने असावं, रडावं एवढा त्याचा अधिकार असावा.
सत्यार्थी यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप 'तमसो मा ज्योतिर्गमय' या श्लोकने केला. कैलाश सत्यार्थी यांनी सांगितलं, आपल्याला अज्ञानतेकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे पाऊल टाकायचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.