दुपारी ३.०० वाजता
- शार्ली हेब्दोवर हल्ला करून ठार करणाऱ्या फरार क्वाची बंधुंनीच हा हल्ला घडवून आणल्याची माहिती
- क्वॉची ब्रदर्सच्या मागे ९० हजार पोलीस
- हेलिकॉप्टरनं सर्च ऑपरेशन सुरू
दुपारी २.४० वाजता
- भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार
- दहशतवादी ज्या भागात लपलेत तो औद्योगिक भाग आहे
- दहशतवाद्यांशी संवाद साधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू
दुपारी २.४० वाजता
- फायरिंगमध्ये दोन जणांचा मृत्यू तर २० जण जखमी झाल्याची माहिती
- एका बिल्डिंगमध्ये दहशतवादी हल्लेखोर लपून बसलेत.
- दहशतवाद्यांनी अनेक लोकांना बंधक बनवल्याची माहिती
- हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणेनं घेरलं
पॅरीस : फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी दहशतवादी हल्ला झाल्याचं समजतंय.
उत्तर पूर्व पॅरिसमध्ये एका गाडीवर अज्ञात लोकांनी गोळीबार केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी एका व्यक्तीलाही बंधन बनवण्यात आलंय.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेमारर्टिन एन गोएले शहरातून एका व्यक्तीला बंधक बनवलं गेल्याची माहिती मिळतेय. आज सकाळी मोंटगेनी सेंटे फेलिसिटे नावाच्या शहरातून करड्या रंगाची एक कार चोरी करण्यात आली होती. ही कार चोरी करून हल्लेखोर पळत असताना गाडीचा पाठलाग केल्यानंतर हा गोळीबार करण्यात आला.
फ्रेंच सुरक्षा एजन्सीनुसार, पॅरिसमध्ये शार्ली हेब्दो मॅगझीनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनीच ही गाडी चोरली होती.
घटनास्थळी पोलिसांनी लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्यात. पॅरिसमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हा हल्ला झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.