इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इम्रान खान आणि टीव्ही अँकर रेहम खान यांचा निकाह झाल्याचं स्पष्ट झालं आहे, कारण तहरीक-ए- इंसाफ पार्टीचे नेते इम्रान इस्माईल यांनी ही माहिती पाकिस्तानच्या जिओ टीव्हीला दिली आहे.
इम्रान-रेहमचा निकाह इम्रानच्या बानी गाला इथल्या घरी पार पडला. इम्रान इस्माईल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दावत-ए-वलीमा आहे. वलीमा म्हणजे निकाहानंतर नवरीमुलगी मुलाच्या घरी आल्यानंतर स्नेहभोजन दिलं जातं त्याला वलीमा असं म्हणतात.
६२ वर्षांचा इम्रान खान आणि ४१ वर्षांची रेहम खान यांचा निकाह फारसा गाजावाजा न करता, डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात संपन्न झाला होता. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ती बातमी बाहेर आली आहे. मात्र यात तथ्य नसल्याचं इम्रान खानने म्हटलं होतं, मात्र इम्रान आणि रेहमच्या निकाहविषयी कुजबूज सुरूच होती. रेहम खान हीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
रेहम खानची ओळख
रेहम खान पहिल्या लग्नानंतर ब्रिटनमध्ये राहत होती, पण ती मूळची पाकिस्तानची आहे. रेहमनं पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे. ती तीन मुलांची आई आहे. बीबीसीवर 'साऊथ टूडे' हा प्रादेशिक कार्यक्रम आणि हवामानाचा अंदाज रेहमची सादर करत होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.