काठमांडू : गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे.
नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी साव्हेशन आर्मीची एक टीम नेपाळच्या सिंधूपाल चौक या गावात मदत कार्य करायला गेले होते. त्याच वेळी ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यावेळी मायकल अँड्र्यू याने कॅमेऱ्यात हा थरारक व्हिडिओ कैद केला आहे. भूकंपाचा हादरा बसल्यानंतर कसा डोंगर कोसळतो. हे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे.
पाहा हा भयंकर व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.