www.24taas.com, स्टॉकहोम
अशिया खंडात सर्वत्र गुपचुप हत्यारं विकत घेण्याची स्पर्धा लागली आहे. अभ्यासकांच्या मते जागतिक महासत्तेचं केंद्र भविष्यात अशिया खंडातच असेल. बहुतांश अभ्यासकांच्या मते चीन जागतिक महासत्ता बनू शकतो. पण त्याचवेळी शांतताप्रिय भारत हा शस्त्रखरेदीत अग्रेसर असल्याचं दिसून आलं आहे.
ज्यांच्याकडे सर्वाधिक शस्त्रं आहेत, तोच देश भविष्यात महासत्तेला गवसणी घालू शकतो. भारत शस्त्रखरेदीत प्रथम क्रमांकावर आहे. तर चीन शस्त्रविक्रीत पुढे आहे. जगामध्ये शस्त्रविक्रीत चीनचा पाचवा नंबर लागतो. पूर्वी इंग्लंड शस्त्र विकण्यात पुढे असायचा. मात्र आता ती जागा चीनने घेतली आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टमधून ही सर्व माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर चीनकडून शस्त्रखरेदी केली आहे. मात्र खरेदीनंतर भारताकडे सर्वाधिक शस्त्रसाठा जमा झाला आहे. त्यामुळे भारतही जागतिक महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत पुढे आहे.