नवी दिल्ली : रत्नागिरीतील बानकोट येथील तरुणाची सऊदी अरबमध्ये हत्या करण्यात आली आहे. म्हसब आबा परमार असं या तरुणाचं नाव असल्याचं बोललं जातंय. ४ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडल्याची माहिती आहे.
म्हसब परमार मागील ४ वर्षापासून सौदीमधील शेख परिवाराकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या दरम्यान त्याचा मालकासोबत वाद झाला आणि यादरम्यान त्या मालकाने म्हसबवर ३ गोळ्या झाडल्या.
या घटनेनंतर आरोपीने सरेंडर केलं. म्हसबचा विवाह हा मे महिन्यातच ठरला होता. भारतीय दूतावासाने म्हटलं आहे की, संपूर्ण कायदेशीर प्रकियेनंतर 2 दिवसात म्हसबचं पार्थिव बानकोट येथे पाठवलं जाईल.