www.24taas.com, तेहराण
अमेरिकेकडून सायबर सर्व्हरवर हल्ला होणार होता. हा हल्ला आम्ही टाळला आहे, अशी माहिती इराणच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिली आहे.
अमेरिकेतील डलास शहरातून सायबर सर्व्हरवर हल्ला घडवून आणण्यात आला होता. मात्र, आम्ही योग्य ती खबरदारी घेऊन हा हल्ला उधळवून लावला आहे. तेहरानमधील प्रेनसा लॅटिना या वृत्तसंस्थेने तसे वृत्त दिले आहे.
या वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकेचा सायबर हल्ला हा मलेशिया आणि व्हिएतनाम येथील सर्व्हरच्या माध्यमातून केला गेला होता. मात्र, हा हल्ला सर्पोटींग अण्ड प्रोटेक्टींग वर्क्स आर्ट अण्ड कल्चर या विभागाच्या तज्ज्ञांनी तो हाणून पाडला.
इराणमधील अधिकारी यांनी अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून अणूकेंद्र आणि औद्योगिक केंद्र या ठिकाणी करण्यात आलेला सायबर सर्व्हर हल्ला निकामी केला आहे.
इराणमधील सायबर बटालियन असे हल्ले रोखण्यासाठी मदत करीत आहे. २४ तास ही बटालियन सायबर हल्ल्यांवर नजर ठेवून असणार आहे. २०१०पासून इराणमधील सायबर नेटवर्कच्या माध्यमातून स्टक्सनेट असा व्हायरस हल्ला करण्यात येत आहे. अशा ह्ल्ल्याच्या निशाण्यावर अणुऊर्जी निर्मिती केंद्र आहेत, असे वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.