www.24taas.com, वृत्तसंस्था, पर्थ/कुआलालंपूर/बीजिंग
मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध लागल्याची शक्यता वाढलीय. चीनच्या उपग्रहांना दक्षिण हिंदी महासागरात एक मोठी वस्तू तरंगतांना आढळल्याच्या एक दिवसानंतरच ऑस्ट्रिलायनं आज सांगितलं की, महासागरातील लांब भागात लाकडाचा एक खोका बघितला गेलाय.
बेपत्ता विमानाचा शोध घेण्याचा हा तिसरा आठवडा आहे. चीनच्या उपग्रहांकडून ज्या मोठ्या वस्तूचा फोटो मिळाला. ती वस्तू म्हणजे विमानाचा मलबा असू शकतो. मलेशियाचे संरक्षण आणि वाहतूक मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी कुआलालंपूरमध्ये पत्रकारांना सांगितलं की ही वस्तू २२.५ मीटर लंबी आणि १३ मीटर रूंद आहे.
८ मार्चला मलेशियन एअरलाईन्सचं विमान एमएच ३७० अचानक बेपत्ता झालं. विमानात २३९ प्रवासी होते त्यात पाच भारतीय नागरीक आणि एक भारतीय वंशाची कॅनडाची प्रवासी होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टॉनी एबॉट म्हणाले आमच्या एका तपास विमानानं समुद्र क्षेत्रात काही मोठ्या तर काही छोट्या वस्तू बघितल्या. त्यात एक लाकडी बॉक्स सुद्धा होता. त्यामुळं आता या वस्तू म्हणजे बेपत्ता विमानाचा मलबा असू शकतो, त्यामुळं त्याच्या तपासासाठी आता जहाज आणि विमानं तिकडे पाठवण्यात आलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.