पाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव

जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.

PTI | Updated: Oct 12, 2014, 03:50 PM IST
पाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव title=

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताझ अझीज यांनी आज संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान की-मून यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय, की काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप करावा. भारतीय जवानांकडून गेल्या काही दिवसांपासून सतत पाक सैन्यावर गोळीबार करण्यात येत आहे आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळं आमची मागणी आहे, की आपण एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेचा आढावा घ्यावा. या भागात शांतता आणि सुरक्षा राहावी, अशी आमची इच्छा आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून सतत भारतीय चौक्यावर आणि सीमेवरील गावांवर गोळीबार होत असताना, आता त्यांच्याकडून अशा प्रकारे कांगावा करण्यात आला आहे. त्यामुळं पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.