'प्लेबॉय' मॅगझिनमध्ये यापुढं नग्न फोटो नसणार

हॉट आणि बोल्ड छायाचित्रांसाठी पुरुषांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्लेबॉय मॅगझिनमध्ये आता महिलांची नग्न छायाचित्र छापणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन्सच्या काळात सध्या प्रत्येकाला एका क्लिकवर सेक्ससंबंधींचे छायाचित्र उपलब्ध झाल्यानं प्लेबॉयनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. 

Updated: Oct 13, 2015, 04:21 PM IST
'प्लेबॉय' मॅगझिनमध्ये यापुढं नग्न फोटो नसणार title=

न्यूयॉर्क: हॉट आणि बोल्ड छायाचित्रांसाठी पुरुषांमध्ये प्रसिद्ध असलेल्या प्लेबॉय मॅगझिनमध्ये आता महिलांची नग्न छायाचित्र छापणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन्सच्या काळात सध्या प्रत्येकाला एका क्लिकवर सेक्ससंबंधींचे छायाचित्र उपलब्ध झाल्यानं प्लेबॉयनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. 

आणखी वाचा - 'यूनिव्हर्सिटी ऑफ पॉर्न'मध्ये 21 इच्छुकांना प्रवेश!

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्लेबॉयचे सीईओ स्कॉट फ्लँडर्स आणि प्लेबॉयचे संस्थापक ह्यू हेफनर यांच्यात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत प्लेबॉय मॅगझिनमध्ये महिलांची नग्न छायाचित्र छापणं बंद करण्यास हेफनर यांनी होकार दिला आहे. सध्या प्रत्येक किशोरवयीन मुलगा इंटरनेटशी जोडलेला आहे आणि इंटरनेटवर पॉर्न अगदी सहज बघायला मिळतं. त्यामुळं हा निर्णय घेण्याची गरज होती असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र यापुढंही महिलांची कामूक छायाचित्र छापलं जातील असा निर्णय प्लेबॉयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. प्लेबॉयचे सीईओ स्कॉट फ्लँडर्स यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

आणखी वाचा - घरात मेडसोबत चाळे करणाऱ्या दगाबाज नवऱ्याला केलं Expose,पत्नीवरच संकट

१९५३मध्ये अमेरिकेत प्लेबॉय या मासिकाची सुरुवात झाली. ख्यातनाम अभिनेत्री आणि मॉडेल्सची नग्न किंवा अर्धनग्न अवस्थेतील छायाचित्र प्लेबॉयच्या कव्हर पेजवर झळकायची. त्यामुळं अवघ्या काही महिन्यांमध्येच प्लेबॉयला फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातील पुरुष वाचकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.