शियान : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात उभयदेशांत विश्वास मजबूत करण्यासंबंधी चर्चा झाली. परदेश सचिव एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग आणि मोदी यांच्या बैठकीत अर्थपूर्ण चर्चा पार पडली. दोघांनीही सीमा प्रश्न, शांती तसंच स्थिरतेसोबतच व्यापार संतुलन स्थापित करण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. उभयदेशांत आर्थिक गुंतवणुकीबद्दलही चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान दहशतवादाविरोधात एकमेकांना सहयोग करण्यावरही जोर देण्यात आला.
- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी, सर्व प्रोटोकॉल तोडत जिनपिंग मोदींना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
- यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शियानमध्ये दाखल झाले. इथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. चीनी लोकांचा उत्साह पाहून मोदी भावूकही झाले.
- यानंतर मोदींनी दशिंग शान मंदिरात जाऊन पूजा केली. इथं व्हिजिटर बुकमध्ये मोदींनी आपला संदेशही लिहिला.
Watch: Traditional welcome for PM @narendramodi https://t.co/grOp48La8i
— PMO India (@PMOIndia) May 14, 2015
विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. तीन दिवसांचा हा दौरा आहे. चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच चीन दौरा आहे.
भारत आणि चीन म्हणजे आशियातले दोन बडे विकसनशील देश... त्यामुळं दोन्ही देशांसाठी हा दौरा मैलाचा दगड ठरणाराय. या दौऱ्यात मोदी राष्ट्रपती जिनपिंग यांचं शहर शियानसह राजधानी बीजिंग आणि शांघायला भेट देणार आहेत.
भारत-चीन सीमा प्रश्न, सिल्क रोड प्रोजेक्ट, भारतात चिनी गुंतवणूक अशा विविध मुद्यांवर या दौऱ्यात चर्चा होणार आहे. १७ मे रोजी मोदी मंगोलियाला जाणारायत. तिथल्या संसदेसमोर ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर १८ आणि १९ मे रोजी मोदी दक्षिण कोरियामध्ये असणार आहेत.
चीनच्या तीन दिवसांच्या दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शियान शहरातील टेराकोटा वॉर मेमोरियलला भेट दिली. चीनचा दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष सांगणारा टेराकोटा वॉर मेमोरियल चीनची राष्ट्रीय संपत्ती मानला जातो. शाक्सी वंशाच्या किन शी हुआंग यांच्या सैन्याला टेराकोटा आर्मी असं म्हटलं जातं. या वॉर मेमोरियलमध्ये आठ हजार चीनी सैनिकांच्या मूर्त्या आहेत आहेत.
कसा असेल मोदींच्या दौऱ्याचा आजचा दिवस पाहुयात...
सकाळी ९.२५ - पंतप्रधान मोदी शान मंदिराला भेट देणार
दुपारी १.०० - राष्ट्रपती जिनपिंग यांची भेट
दुपारी २.२० - पॅगोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम
दुपारी ३.४० - साउथ सिटी वॉल येथे स्वागत
संध्याकाळी ४.०० - राष्ट्रपती जिनपिंग यांच्या शाही भोजनाला उपस्थिती
संध्याकाळी ५.०० - सांस्कृतीक कार्यक्रमाला उपस्थिती
रात्री ८.०५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजिंगमध्ये दाखल होणार
चीन कडून भारताच्या काय अपेक्षा आहेत पाहुयात...
सीमेवर स्थिरता आणि घुसखोरी थांबावी,
वाद मिटवण्यासाठी रोड मॅप
आर्थिक संबंधांमध्ये मजबुती
पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक
'मेक इन इंडिया'साठी चीनकडून मदतीचा हात
व्यापार क्षेत्रात संतुलन
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.