www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग
चीन आणि भारतादरम्यान असलेल्या सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, असं पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी म्हटलं आहे. सध्या चीनच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधानांनी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आपण इतिहासाच्या आधारे नव्हे, तर भविष्याचा विचार करून संबंध सुधारण्यावर भर दिला पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले. गौतम बुद्धानं सांगितलेल्या पंचशील तत्वाची आठवणही त्यांनी करून दिली.
भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषेवर गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान मंगळवारी विश्वासवृद्धी करार करण्यात आला.
चिनी पंतप्रधान ली क्वियांग व भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीनंतर हा करार झाल्याची घोषणा करण्यात आली. सीमारेषेवर शांततापूर्ण वातावरण ठेवणे हा या कराराचा मुख्य हेतू आहे.
दरम्यान, या चर्चेमध्ये सिंग यांनी दोन्ही देशांमधील व्यापारात भारताला कराव्या लागणाऱ्या वित्तीय तूटीच्या आव्हानाचा मुद्दा उपस्थित केला.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.