मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत. पुतीन यांच्या आयुष्यात आलेली ही महिला आहे मीडिया किंग रुपर्ट मरडॉक यांची माजी पत्नी वेंडी डेंग.
युएस विकली या वेबसाईटनं पुतीन आणि वेंडी यांच्याबाबतची ही बातमी दिली आहे. तसंच हे दोघं डेटींगवर असल्याचंही या वेबसाईटनं सांगितलं आहे. वेंडी डेंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
रुपर्ट मरडॉक आणि वेंडी डेंग यांनी 2013मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री मिक जॅगरशी लग्न केलं. तर पुतीन यांनी ल्युडमिला यांना 2014 मध्ये घटस्फोट दिला आहे.