वॉशिंग्टन : दिल्ली निवडणुकांच्या तोंडावर भाजपला 'जोर का झटका' धीरे से लागलाय... तो देखील साता समुद्रापलिकडून...
भारतात गेल्या काही काळात धार्मिक असहिष्णुता वाढल्याचं विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलंय. आज गांधीजी असते, तर त्यांना ही धार्मिक असहिष्णुता पाहून नक्कीच धक्का बसला, असता असंही ओबामांचं म्हणणं आहे.
'गेल्या काही वर्षांत भारतात धार्मिक असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढलीय. आज जर गांधीजी असते तर त्यांनादेखील धक्का बसला असता' असं विधान प्रजासत्ताक दिनानिमित्तानं भारतात पाहुणे म्हणून आलेल्या बराक ओबामा यांनी केलंय.
आपल्या दौऱ्याचा उल्लेख करत, भारत हा एक सुंदर देश आहे... पण, गेल्या काही वर्षांमध्ये इथं सर्वच धर्मांचे एकमेकांवरच्या हल्ल्यांत वाढ झालीय, असंही त्यांनी म्हटलंय. ते हाई-प्रोफाइल 'नेशनल प्रेयर ब्रेकफास्ट' दरम्यान बोलत होते.
नुकत्याच झालेल्या टाऊनहॉल मिटिंगमध्येही ओबामांनी भारत जेव्हापर्यंत धर्माच्या नावावर अभेद्य राहील तेव्हापर्यंत यशाची शिखरं चढत राहील, असं म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.