इडेनबर्ग : स्कॉटलंडनं ऐतिहासिक ‘जनमत संग्रह’मध्ये आपलं मत नोंदवत स्कॉटलंड युनायटेड किंगडमपासून विभक्त होणार नाही, असा निर्णय दिलाय. स्कॉटलंजच्या जनतेनं स्वातंत्र्य धुडकावून लावलंय.
जनमताच्या निर्णयानुसार, ५५.४२% टक्के जनतेनं ‘नाही’ तर ४४.५८% टक्के जनतेन ‘होय’ हा पर्याय निवडलाय. ब्रिटनपासून स्कॉटलंडनं वेगळं व्हावं किंवा नाही, असे पर्याय त्यांच्यासमोर होते. आत्तापर्यंत ३१ पैंकी ३२ राज्यांचा निकाल हाती आलाय.
'नाही' या पर्यायाल १,९१४,१८७ मतं मिळालीत तर 'होय' या पर्यायाला १,५३९,९२० मतं मिळालीत.
मतदानाच्या या निकालानंतर आता हे स्पष्ट झालंय की स्कॉटलंड आता ब्रिटनमधून विलग होणार नाही... त्यामुळेच, स्कॉटलंड हा स्वतंत्र देश म्हणूनही अस्तित्वात येणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
‘जनमत संग्रह’मध्ये ब्रिटनच्या बाजुनं निर्णायक मतदान झालेलं दिसतंय. मतदानाच्या निकालानुसार, स्कॉटलंडच्या २२ राज्यांना ब्रिटनमधून वेगळं व्हायचं नाहीय.
‘युनायडेट किंगडम’मधून बाहेर पडावं किंवा नाही? याचा निर्णय घेण्यासाठी स्कॉटलंडमध्ये गुरुवारी सार्वमत नोंदवलं गेलं. स्कॉटिश जनता परंपरेला चिकटून ब्रिटनमध्येच राहणं पसंत करते, की राणीच्या नेतृत्वातून मुक्त होते, याचा फैसला स्कॉटलंडच्या ३२ प्रांतांमधील नागरिकांनी आपलं मत नोंदवून केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.