जिनेव्हा : अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच इथं बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.
स्वित्झर्लंडच्या न्याय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, ‘अटक झालेल्यांमध्ये लाचखोर संशयित खेळ मीडिया आणि खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, कथित फुटबॉल अधिकारी, फिफाचे प्रतिनिधी आणि फिफाच्या उपसमितीच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दहा कोटींपेक्षा अधिक डॉलर रकमेची लाच स्वीकारल्याचा या सर्वांवर संशय आहे. या मोबदल्यात लॅटिन अमेरिकेत होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेशी संबंधित माहिती, मीडिया, मार्केटिंग आणि प्रायोजन अधिकार प्राप्त केल्याचं मानलं जात आहे.
अमेरिकेच्या आग्रहावरून १९९० च्या दशकापासून आतापर्यंत लाच स्वीकारून माहिती पुरविल्याचा सात अधिकाऱ्यांवर आरोप ठेवण्यात आला. या अधिकाऱ्यांना प्रत्यारोपण पूर्ण होईस्तोवर कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये राफेल एसक्विवेल, कोस्टा तकास, जेफ्री वेब, एडवर्डाली, युगेनियो फिगुएरेडो, ज्युलिओ रोचा, जोस मारिया मारिन यांचा समावेश आहे.
लाचेचीही रक्कम अमेरिकेच्या बँकेतून पाठविण्यात आल्याची देखील शंका आहे. स्थानिक झुरिच पोलिसांनी शहरातील मोठ्या हॉटेलमधून सर्वांना ताब्यात घेतले. फिफाला सद्यस्थितीवर स्पष्टीकरण हवे आहे; पण अटक झालेल्यांबद्दल काहीच बोलायचे नाही, असं फिफाच्या प्रवक्त्यानं सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.