मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान नेहमीच काही ना काही नवीन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'दंगल'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटादरम्यान आमिरने घातलेले कपडे आता तुम्हालाही विकत घेता येणार आहेत.
या चित्रपटासाठी आमिर खानने तब्बल २५ किलो वजन वाढवलं होतं. यानंतर मात्र त्याला ते वजन कमी करावं लागलं. वजन वाढलेलं असताना सहाजिकच त्याला त्याचे जुने कपडे होत नव्हते. म्हणून त्याने अनेक नवीन कपडे विकत घेतले.
आता वजन कमी केल्यावर मात्र त्याला ते कपडे होत नाहीत. म्हणून त्याने ते कपडे दान करण्याचा निर्णय घेतलाय. पण, तो ते असेच दान करणार नाही. त्या कपड्यांचा लिलाव करुन ते पैसे तो दान करणार आहे. या कपड्यांमुळे गरीबांना फायदा व्हावा असा त्याचा उद्देश आहे.
'दंगल' हा चित्रपट हरियाणा राज्यातील पैलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. महावीर यांनी समाजाच्या विरोधाला झुगारुन आपल्या दोन मुलींना कुस्तीच्या मैदानात उतरवलं होतं.