लुधियाना : पंजाबच्या लुधियानतल्या स्थानिक न्यायालयानं अभिनेत्री राखी सावंतच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलंय. महर्षी वाल्मीकी यांचा केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राखी सावंत अडचणीत आलीय.
राखीच्या विरोधात लुधियानामध्ये वाल्मीकी ऋषींच्या अनुयायांच्या भावना दुखवल्याचा खटला सुरू आहे. याप्रकरणी 9 मार्च रोजी राखीला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण वारंवार समन्स बजावूनही राखी कोर्टात येत नसल्यानं तिच्या विरोधात व़ॉरंट जारी करण्यात आलंय.
याप्रकरणी १० एप्रिलला पुढची सुनावणी आहे. त्याआधी राखीला ताब्यात घेण्यासाठी लुधियाना पोलिसांची एक टीम रवाना झाल्याचंही पीटीआयच्या सूत्रांचं म्हणणं आहे.