'बालिकावधू'ची बॉयफ्रेन्डसोबत कान्सला हजेरी

बालिकावधू या कार्यक्रमातून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री अविका गौर सध्या तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी याच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. 

Updated: May 20, 2016, 02:28 PM IST
'बालिकावधू'ची बॉयफ्रेन्डसोबत कान्सला हजेरी title=

पॅरीस : बालिकावधू या कार्यक्रमातून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री अविका गौर सध्या तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी याच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय. 

'अनकही बातें' या शॉर्ट फिल्मच्या पोस्टर लॉन्चिंगसाठी हे दोघे कान्समध्ये उपस्थित होते. या शॉर्टफिल्ममध्ये मनीष आणि अभिनेत्री बरखा बिष्ट यांनी अभिनय केलाय. तर अविका या शॉर्टफिल्मची क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे. मानव भिंडर या शॉर्ट फिल्मचा दिग्दर्शक आहे. 

यावेळी, अविका आणि मनीषनं 'ऑलमोस्ट' आणि 'व्हेन आय मेट मायसेल्फ' या दोन शॉर्टफिल्म्सचेही पोस्टर लॉन्च केले. 

अविका आणि मनिषच्या अफेअरची चर्चा 'ससुराल सीमर का' या कार्यक्रमापासून आहे. लवकरच अविका एका तमिळ सिनेमातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. 

#rosid #rosidins #rosidians #aviman #avimanian #avimans @manishraisinghan @avika_n_joy

A photo posted by Avika Gor (@meavikasgor) on

....

A photo posted by Avika Gor (@meavikasgor) on