मुंबई : तुम्ही जोश, माचिस, क्या कहना, दिल क्या करे, यासारख्या चित्रपटात अभिनय केलेला हा अभिनेता तुम्हाला आठवतो का?
चंद्रचूड सिंह गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. मात्र आता हा अभिनेता पुन्हा पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे.
जोश, क्या कहनामध्ये चॉकलेट हिरो असलेला हा अभिनेता खूप बदललाय. त्याचा हा लूक त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का देणारा असेल.