मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार तुम्हाला नेहमीच भरभरून हसवतात, कामाचा सर्व ताण विसरायला लावतात, तणावामुळे गोठण्याकडे चाललेल शरीरातलं रक्त पुन्हा वेग घेतं, हसत हसत शरीर भर प्रवास करतं, आणि तुम्हाला पुन्हा ताज तवानं करून टाकतं, उद्याला पुन्हा कामाची उर्मी देतं.
हे औषध फक्त चला हवा येऊ द्याचे कलाकारचं देऊ शकतात, खळखळून हसण्याचे रामबाण उपाय त्यांच्याकडे आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावर हसू त्यांनी दिलंय. अनेकांचं हसून हसून ते आयुष्य वाढवतायत, कुणालाही न दुखावता ते सर्वांच्या आयुष्यात उत्साह भरतात.
'चला हवा येऊ द्या'मधील कलाकार आपल्या कुटुंबातीलच सर्वांना वाटतात, या कलाकारांच्या आयुष्यातही असे काही लोक आहेत, जे त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात, जीवापाड प्रेम करतात, त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्साही असतात, अशाच लोकांबद्दल हे कलाकार हळवे होतात, भावनिक होतात, या व्हिडीओत त्याच भावना आहेत, जरा ऐकून घ्या...