प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशनने 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कारासाठी निवडलं आहे. प्रियंकाला 'बाजीराव मस्तानी' मधील काशीबाईच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Updated: Apr 11, 2016, 12:59 AM IST
प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशनने 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कारासाठी निवडलं आहे. प्रियंकाला 'बाजीराव मस्तानी' मधील काशीबाईच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रियांका दुसऱ्या वेळेस या अवार्डसाठी निवडली गेली आहे. २०११ मध्ये प्रियांकाला सात खून माफसाठी पुरस्कार देण्यात आला होता. प्रियांकाला दादासाहेब फाळकेंच्या १४७ व्या जयंतीच्या निमित्ताने सन्मानित करण्यात येईल. २४ एप्रिल रोजी मुंबईत एका कार्यक्रमात प्रियांकाला सन्मानित करण्यात येईल.