नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असली तरी माझ्या परवानगीशिवाय रणबीर लग्न करु शकत नसल्याचे अभिनेत्री दीपिका पादुकोणने म्हटले आहे. रणबीर-कतरिनाच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर तिने हे उत्तर दिलं.
दरम्यान, लग्न हा जीवनातील मोठा निर्णय आहे. लग्नाच्या नात्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी लग्न करेन तेव्हा नक्की सगळ्यांना सांगेन असे रणबीर यावेळी म्हणाला.
आणखी वाचा - बॉलीवूडमधील प्रियंका माझी पहिली मैत्रीण
रणबीर-दीपिका यांचा बहुचर्चित आगामी ‘तमाशा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास उत्सुक आहे. याआधी ही जोडी ‘बचना ए हसीनो’ आणि ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात दिसली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.