मुंबई : केवळ २४ व्या वर्षी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिनं गळफास लावून आपलं जीवन संपवलंय.
प्रत्युषानं हे पाऊल का उचललं याबद्दल आता अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. ती गेल्या वर्षापासून अभिनेता - निर्माता राहुल राज सिंग याच्यासोबत नातेसंबंधात होती. या दोघं विवाहाच्या निर्णयावर येऊन ठेपले होते. 'पावर कपल" या कार्यक्रमातून ही जोडी एकत्र दिसली होती.
२०१३ साली या दोघांची एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आपण तासनतास एकमेकांशी बोलण्यात घालवतो, असं त्यांनी कबूल केलं होतं.
परंतु, कुठेतरी माशी शिंकली आणि या दोघांचं नातं हेलकावे खाऊ लागलं होतं, असं प्रत्युषाच्या मित्रमंडळींकडून समजतंय. यामुळेच, प्रत्युषा निराशेच्या आहारी गेली होती. त्यातूनच तिनं हे पाऊल उचललं असावं असं समजलं जातंय.