बॉलिवूडमधील डर्टी पिक्चर आता मराठीत

Updated: Dec 20, 2014, 09:39 PM IST
 बॉलिवूडमधील डर्टी पिक्चर आता मराठीत

 

मुबंई : सिल्कच्या जीवनावर हिंदीमध्ये आलेला डर्टी पिक्चर बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरल्यानंतर आता मराठीमध्ये या चित्रपटाच्या निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत.

हिंदीमध्ये विद्या बालनने सिल्क स्मिता रंगवली होती. मराठीमध्ये सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी स्मिता गोंदकर या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा होती. स्मिता गोंदकरकडे या भूमिकेसाठी विचारणाही झाली होती. मात्र आता फैझल सैफ यांनी स्मिता गोंदकर आता  स्लिक स्मिताची भूमिका साकारणार नसल्याचे स्पष्ट केलेय.

फैझल सैफ या चित्रपटाचे कथालेखक आहेत. सिल्क स्मिताच्या जीवनावरील चित्रपट हा एक बोल्ड विषय आहे. यात मुख्य भूमिका साकारणा-या अभिनेत्रीकडे एक बिनधास्तपणा आवश्यक आहे. स्मिता अधिक बोल्ड नसल्याने तिला नाकारले, असे ते म्हणालेत.

समीर खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी 'पेज ३'  आणि 'ट्रॅफीक सिंग्नल' या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. स्मिता गोंदकर सारखी मराठीतली बोल्ड अभिनेत्री सिल्क स्मिता रंगवणार नसेल तर, सिल्क स्मिता रंगवणारी दुसरी मराठी अभिनेत्री कोण असेल ? मराठी सिनेमा आतापर्यंत बिकनी सीन आणि चुंबन दुश्यापर्यंत मर्यादीत होता. पण त्यापुढे पाऊल टाकत प्रथमच मराठीमध्ये इतका बोल्ड विषय हाताळला जाणार आहे हे निश्चित, हेच फैझलच्या बोलण्यावरून समजत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.