...तर 'बाहुबली'मध्ये ऋतिक किंवा जॉनही दिसला असता!

भल्या-भल्यांच्या हातून कशा संधी निसटत असतात, याचं उदाहरण म्हणजे 'बाहुबली'... भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या मोशन पिक्चरमध्ये आपल्याला ऋतिक रोशन किंवा जॉन अब्राहमही दिसले असते... पण ती संधी मिळाली प्रभासला...

Updated: Jul 14, 2015, 08:58 AM IST
...तर 'बाहुबली'मध्ये ऋतिक किंवा जॉनही दिसला असता! title=

नवी दिल्ली : भल्या-भल्यांच्या हातून कशा संधी निसटत असतात, याचं उदाहरण म्हणजे 'बाहुबली'... भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या मोशन पिक्चरमध्ये आपल्याला ऋतिक रोशन किंवा जॉन अब्राहमही दिसले असते... पण ती संधी मिळाली प्रभासला...

होय, मिळालेल्या माहितीनुसार, 'बाहुबली' या सिनेमाचा दिग्दर्शक एस एस राजामौली याला या सिनेमाचं हिंदी स्वरुप बनवायचं होतं. त्यानं या दोन्ही अभिनेत्यांना या सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी विचारलंही होतं. पण दोन्ही अभिनेत्यांनी त्यात रस दाखवला नाही. त्यानंतर राजामौलीनं हा विचारच सोडून दिला आणि हिंदी सिनेमाऐवजी तमिळ सिनेमाचंच डब हिंदी वर्जन सादर केलं. 

राजामौलीनं दोन्ही अभिनेत्यांना या सिनेमाची स्क्रिप्ट धाडली होती.... आणि ही कथा सांगण्यासाठी वेळही मागितला होता. पण दोन्ही अभिनेत्यांकडून त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. या सिनेमावर तीन वर्षापूर्वी काम सुरू झालं... आणि त्यावेळी हा सिनेमा भारतीय सिनेमा जगतातील सर्वात मोठा आणि महागडा चित्रपट होईल असं कुणालाही वाटलं नसेल.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.