मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचाचं आकर्षण बॉलिवूडमध्ये वाढतच आहे. आजवर बॉलिवुडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली.
या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडणार आहे ते नाव म्हणजे बॉलिवुडची ‘क्वीन’ अशी ओळख असलेली कंगना राणावत. आपल्या आगामी 'रंगून' चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कंगनाने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. येत्या सोमवारी २० फेब्रुवारीला रात्री ९.३० वा. हा भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे. या भागामध्ये कंगनासमोर भाऊ कदमनं कंगनाला त्याची वेगळीच ओळख सांगितली. यामुळे कंगनाही हास्याच्या रंगात रंगून गेली.
आज भाऊंच्या Performance मुळे कंगनाही 'रंगून' जाणार या हास्याच्या विश्वात..!#CHYD pic.twitter.com/2nLIzJvBpm
— Zee Marathi (@zeemarathi) February 20, 2017