पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांवर नानांचा घणाघात

सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका

Updated: Oct 3, 2016, 08:02 PM IST
पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांवर नानांचा घणाघात title=

पुणे : सीमेवरचे जवान हेच खरे हिरो आहेत. पहिले ते मग आम्ही कलाकार, त्यामुळे लायकी नसणाऱ्यांना महत्त्व देऊ नका, असं म्हणून नाना पाटेकर यांनी सलमान खानवर नाव न घेता टीका केली आहे.

पाकिस्तानी कलाकार हे काही दहशतवादी नाहीत, असं वक्तव्य सलमान खाननं केलं होतं. यानंतर मोठा वाद झाला होता. सलमान खानवर याच वक्तव्यावरून जोरदार टीकाही होत आहे.

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या सगळ्या घडामोडींमुळे भारत-पाकिस्तानमधले संबंध आणखी ताणले गेले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतातल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये बंदी घालण्याची मागणी झाली. मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जायचा इशारा दिला, तर इम्पानं पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटांमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

पाहा नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर