मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने १६ डिसेंबरच्या सामूहिक बलात्कार घटनेवर आधारित बनविण्यात आलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवर केंद्र सरकारने बंदी घालणे योग्य नाही,अशी प्रतिक्रिया व्यक्त करत अन्य बॉलिवूडमधील सेलिब्रिटीजमध्ये सहभागी झालेय.
ब्रिटीश फिल्म निर्माती लेस्ली उडवीन हिने बनविलेल्या 'इंडियाज डॉटर' डॉक्युमेंट्री मी पाहिलेली नाही. मात्र, प्रेक्षकांना काय पाहायचे आहे, ते त्यांच्यावर सोडून द्या, असे अनुष्का म्हणाली.
मला वाटते, अशा गोष्टी लोकांवर सोडून द्या. लोकांच्या विवेकाधिकार आणि त्यांची बुद्धीमता यावर सोडली पाहिजे. आम्ही आमच्या भावना समजण्यास सक्षम आहे. परंतु लोकांनी काय पाहायला पाहिजे, हे दुसऱ्यांने सांगणे, हे आमच्यावर अन्याय केल्यासारखे आहे. आम्ही आमचा विचार करुन योग्य तो निर्णय घेऊ शकतो, असे अनुष्का म्हणाली.
अनुष्काची नविन सिनेमा 'एनएन१०' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यावेळी ती म्हणाली, अशा घटनांवर गप्प बसणे हा काही पर्याय असू शकत नाही. नाहीतर एक समाजाच्या दृष्टीने आमच्याकडे रुढीवादी म्हणून पाहिले जाईल. लोक दबले जातील. त्यामुळे एन नविन समस्या निर्माण होईल. तसेच या सिनेमाचा निर्माता विक्रमादित्य मोटवाने यांनेही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, बंदी घातणे योग्य नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.