'पीके'नंतर आता आमिर खानचा 'कुस्ती' सिनेमा

वेगवेगळ्याा विषयांवर चित्रपट बनविण्याचा हातखंडा असणाऱ्या परफेक्टनिस्ट आमिर खान 'पीके'च्या यशस्वी घौडदौडीनंतर आता 'कुस्ती'वर आधारित सिनेमा काढत असल्याचे पुढे आले आहे.

Updated: Jan 14, 2015, 04:50 PM IST
'पीके'नंतर आता आमिर खानचा 'कुस्ती' सिनेमा title=

मुंबई : वेगवेगळ्याा विषयांवर चित्रपट बनविण्याचा हातखंडा असणाऱ्या परफेक्टनिस्ट आमिर खान 'पीके'च्या यशस्वी घौडदौडीनंतर आता 'कुस्ती'वर आधारित सिनेमा काढत असल्याचे पुढे आले आहे.

'पीके' नंतर आमिरचा पुढचा काय असेल याची उत्सुकता होती. ही उत्सुकता संपली आहे. आगामी सिनेमात आमिर खान पेहलवानच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिरचा नवीन सिनेमाबाबत सांगितले जात आहे की, हरियाणातील पेहलवान महावीर फोगाट यांचा रोल करणार आहे.

महावीर यांनी आपल्या दोन्ही मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण दिले. या दोन्ही मुलींनी आंतराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केलेय. त्यांनी पदाकांची कमाईही केली आहे.

आमिर खानने आपल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात महावीर फोगाट यांना बोलाविले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.