मुंबई : गेल्या आठवड्यात टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली. मात्र तिच्या आत्महत्येचे गूढ अद्याप उकललेले नाही. काही जण म्हणतात लव्ह लाईफमधील प्रॉब्लेम्समुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं तर काही जण असा तर्क लावतायत की आर्थिक कारणामुळे तिने जीवन संपवले.
प्रत्युषाच्या काही मित्रमैत्रिणींनी तर तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर आरोप लावलेत. तिच्या आत्महत्येसाठी राहुल जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र अद्याप कोणत्याही गोष्टींचा उलगडा झालेला नाहीये.
यादरम्यान, अनुजा सचदेव याने आणखी एक खुलासा केलाय. अनुजा प्रत्युषाचा शेजारी राहतो. त्याने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेबाराच्या सुमारास मी घराबाहेर पडलो आणि लिफ्टसाठी वाट पाहत असताना प्रत्युषाचा रडण्याचा आणि जोरात बोलण्याचा आवाज आला. ती काय बोलत होती हे मला समजले नाही मात्र माझ्या मते ती फोनवर जोरजोरात बोलत होती. कारण दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येत नव्हता. बेल वाजवून काय झाले असे प्रत्युषाला विचारावे असे विचार मनात आला मात्र तेवढ्यात लिफ्ट आल्याने मी घाईघाईत निघालो, असे अनुज म्हणाला.
तसेच प्रत्युषा आणि मी एकमेकांना खूप काही ओळखत नव्हतो. त्यामुळे जेव्हा मी रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा बेल दाबली नाही. एखाद्याच्या खासगी जीवनात का दखल घ्यावी असे वाटल्यामुळेच मी बेल नाही दाबली. मात्र आता असे वाटते की तेव्हा बेल दाबली असती तर वेगळे चित्र असते, असेही पुढे अनुजने सांगितले.