रणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.

Updated: Oct 1, 2014, 06:55 PM IST
रणबीर कपूरचं झालं ऑपरेशन, तब्येत चांगली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ऑपरेशन झालंय. रणबीरला 'अॅडनॉइड टॉन्सिल'चा खूप दिवसांपासून त्रास होत होता. रणबीरची सर्जरी ही त्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसानंतर म्हणजे 29 सप्टेंबरला झाली.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांनी हे स्पष्ट केलंय. रणबीरचं 'अॅडनॉइड सर्जरी' हे खूप मोठं ऑपरेशन नसून सामान्य गोष्ट आहे. रणबीरनं पाच दिवस सुट्टी घेतली होती. त्यामुळं त्यानं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. ऑपरेशनच्या एक दिवस आधी कतरिना कैफने रणबीरला सरप्राइज बर्थडे पार्टी दिली होती.

अॅडनॉइडमुळे रुग्णांना नाकानं श्वास घेताना थोडा त्रास होता. त्यामुळं अशा व्यक्तींना झोपेत श्वास घेतांना त्रास होत असल्यामुळे या रुग्णांचं तोंड खुले राहते आणि ते तोंडानं श्वास घेतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.