चला हवा येऊ द्या'मध्ये सचिन तेंडुलकर

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्यामध्ये आला होता. सचिन थुक्रटवाडीत आल्याने सर्वांसाठी हा एपिसोड खास होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 17, 2017, 05:11 PM IST

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्यामध्ये आला होता. सचिन थुक्रटवाडीत आल्याने सर्वांसाठी हा एपिसोड खास होता. यावेळी सचिनने काही खास किस्से सांगितले, त्यात सौरव गांगुलीचा किस्सा सर्वात हिट आहे. 

तो जरूर ऐका. तर डॉ. नीलेश साबळे यांनी जो सिद्धू साकारला आहे, तो देखील सर्वांना क्लिनबोल्ड करणारा आहे. सर्वात कडक फिल्डिंग बॅटसमनच्या रूपात केली आहे ती भाऊ कदमने, पाहा भाऊ कदम सचिनबद्दल काय म्हणाला आहे. 

सचिन तेंडुलकरवर एक सिनेमा लवकरच येतोय, या सिनेमाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा...