'सैराट'मध्ये रिंकूच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय!

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.

Updated: May 26, 2016, 11:07 AM IST
'सैराट'मध्ये रिंकूच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय! title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.

या सिनमध्ये आई आणि आजी

'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यात तसेच पोलीस स्टेशनबाहेर अशा दोन सिनमध्ये आशा राजगुरु झळकल्या आहेत. गाणे सुरु असताना गच्चीवर उभ्या असलेल्या महिलांच्या ग्रुपमध्ये आशा राजगुरु दिसतात. तर याच गाण्यावर आजीने धम्माल डान्स केलाय. नागराजसोबत एका दृश्यात तिचे वडीलही दिसत आहेत. तर रिंकूसोबत राणी कलरच्या साडीत दिसणा-या आजीबाई या तिच्या आजी आहेत. तुम्ही नीट गाणे पाहिले तर ते तुमच्या लक्षात येईल.

रिंकूच्या आग्रहामुळे भूमिका

कंदरमध्ये तीन दिवस शूटिंग होते. हे शूटिंग रात्रीचे आहे. या गाण्यासाठी लोकांची गर्दी हवी होती. त्यामुळे अकलुज येथील कॉलनीतील बरेचसे लोक या गाण्यात सहभागी झाले. आमची पूर्ण कॉलनी यात सहभागी होती. या गाण्यात माझ्यासह रिंकूचे वडील आणि आजीसुद्धा झळकल्या आहेत, असे रिंकूच्या आई आशा सांगतात.