मुंबई : बॉलीवुड सुपरस्टार सलमान खानचा जिथे कुठे विषय येतो, तिथे सलमानला फॅन्स हेच विचारतात, सलमान खान लग्न कधी करणार. यावर अनेक वेळा बातम्याही येतात.
अनेक अभिनेत्रींसोबत डेटिंग करणारे सलमान खान आपल्या लग्नाबद्दल तळ्यात मळ्यात स्थितीत आहे.
पुण्याच्या एका कॉलेज समारोहात सलमान खान पोहोचला आणि गर्दीने एकच घोषणा सुरू केली, शादी-शादी, तेव्हा सलमान खानने उत्तर दिलं. तुम्ही माझ्या कपाळावर हा घाम पाहाताय ना, तो कुणाला दिसणार नाही, कारण इथलं वातावरण चांगलं आहे, मात्र जेव्हा माझ्या लग्नाचा विषय येतो, तेव्हा मी असमंजस स्थितीत असतो.
हो पण मला तीन चार मुलं हवी आहेत, पण मला माहित आहे, लग्न न करता मुलं असणं फार कठीण आहे, पण मी मॅनेज करू शकतो, पहिल्यांदा लग्नाचं वय नव्हतं, आणि आता लग्नाचं वय निघून गेलं आणि मी आनंदात आहे, असं सलमान खानने म्हटलंय.