'जोरु का गुलाम' शाहीदचे यापुढे किसिंग सीन बंद

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही आता 'सिरियल किसर' इम्रान हाश्मीच्या पायावर पाय देतोय... होय, यापुढे किसिंग सीन न करण्याचा निर्णय शाहीदनं जाहीर केलाय. 

Updated: Oct 20, 2015, 03:51 PM IST
'जोरु का गुलाम' शाहीदचे यापुढे किसिंग सीन बंद title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरही आता 'सिरियल किसर' इम्रान हाश्मीच्या पायावर पाय देतोय... होय, यापुढे किसिंग सीन न करण्याचा निर्णय शाहीदनं जाहीर केलाय. 

लवकरच, प्रदर्शित होणाऱ्या आपल्या 'शानदार' या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये शाहिदनं ही घोषणा केलीय. उल्लेखनीय म्हणजे, शानदार या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत शाहिदनं एक किसिंग सीनही केलाय. 


सौ. ट्विटर

आता मात्र आपणही 'जोरु का गुलाम' बनत असल्याचं शाहिद म्हणतोय. वैवाहिक आयुष्य कसं सुरु आहे, असा जेव्हा शाहिदला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 'मीरा मला संपूर्णत: कंट्रोल करत असल्याचं' शाहिदनं म्हटलंय.

लग्नासोबतच जबाबदाऱ्या वाढल्याचीही जाणीव शाहिदला आहे. मीराचं बॅकग्राऊंड फिल्मी इंडस्ट्रीशी निगडीत नसल्यानं तिच्या घरातलं वातावरण नेहमी साधारण राहिलेलं आहे. त्यामुळेच, आता मीराला कोणत्याही प्रकारे अनकम्फर्टेबल वाटेल असं कोणतंही कृत्य करणार नसल्याचंही शाहिदनं म्हटलंय. त्याचमुळे ऑन स्क्रिन किसिंग आणि लव्ह सीन्स करणार नसल्याचा निर्णय शाहिदनं घेतलाय. 

शाहिद आणि मीराचा विवाह यावर्षी जुलै महिन्यात झाला होता. शाहिद-आलियाचा 'शानदार' 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.