मुंबई : सुल्तान चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड ब्रेक केले. सलमानबरोबरच अनुष्का शर्माच्या अभिनयाचंही कौतुक करण्यात आलं. पण बॉलीवूडमधल्या तीन दिग्गज अभिनेत्रींनी सुल्तान चित्रपटात काम करायला नकार दिल्यामुळे अनुष्का शर्माला हा रोल मिळाला.
अभिनेत्री कंगना राणावत या चित्रपटासाठी पहिली पसंती होती, पण तारखांची कारणं देऊन कंगनानं हा चित्रपट नाकारला. कंगनानं हे कारण दिलं असलं तरी चित्रपटातली भूमिका कमी महत्त्वाची असल्यामुळे कंगनानं सुल्तानला नकार दिल्याच्याही चर्चा आहेत.
कतरिना कैफलाही या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. पण कतरिना तेव्हा रणबीरबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्यानं तिनं सलमानचा चित्रपट नाकारल्याचं बोललं जातंय.
कतरिनानंतर परिनिती चोप्राच्या नावाचीही सुल्तानसाठी चर्चा सुरु होती. आदित्य चोप्रांना परिनितीला सुल्तानमध्ये घ्यायची इच्छा होती, पण तोपर्यंत अनुष्काचं नाव आरफाच्या भूमिकेसाठी निश्चित करण्यात आलं होतं.