मुंबई : भाजपने विधानसभेसाठी केलेली जाहिरात 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?', ही जाहिरात प्रचंड चर्चेत आली, पण ती जाहिरात आता भाजप गुंडाळून ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
या जाहिरातीचं मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंग साईटवर तसेच व्हॉटस ऍपवर विडंबन सुरूच आहे, या जाहिरातीचं भाजपवरचं बुमरँग होतांना दिसतं होतं, अनेकांनी या जाहिरातीची खिल्ली उडवली आहे.
भाजपच्या या जाहिरातीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टिका केली आहे. जाहिरातीतून महाराष्ट्राला बदनाम केलं जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता.
या जाहिरातीमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचीच भावना वाढीस लागत होती, आणि अशी नाराजीची भावना पक्षाला न परवडण्यासारखीच आहे, हे भाजपच्या नेत्यांनी वेळीच लक्षात घेऊन ही जाहिरात बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीत याच प्रकारे महागाईवर जाहिरात केली होती, या जाहिरातीत एक महिला महागाईविषयी तक्रार करत होती, मात्र केंद्रात मोदी सरकार आल्यानंतरही महागाई जाण्याचं नाव न घेत असल्याचं दिसून आल्याने, पुन्हा ही महिला कुठे गेली?, याच महिलेचं ऐकून आम्ही भाजपला मतदान केलं, अशी विचारणा सोशल मीडियावर होत होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.