महायुती फुटल्याने प्रतिमोदी निराश

गेल्या २५ वर्षांची शिवसेना – भाजप युती संपुष्टात आल्यानं या दोन्ही पक्षांना एकदिलानं मानणाऱ्या अनेकांचा हिरमोड झालाय. त्यातीलच एक आहेत... ‘प्रतिमोदी’ म्हणून प्रसिद्ध असणार विकास महंते...

Updated: Sep 30, 2014, 12:13 PM IST
महायुती फुटल्याने प्रतिमोदी निराश title=

मुंबई : गेल्या २५ वर्षांची शिवसेना – भाजप युती संपुष्टात आल्यानं या दोन्ही पक्षांना एकदिलानं मानणाऱ्या अनेकांचा हिरमोड झालाय. त्यातीलच एक आहेत... ‘प्रतिमोदी’ म्हणून प्रसिद्ध असणार विकास महंते...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विकास महंते यांनी ‘प्रतिमोदी’ बनून शिवसेना आणि भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला होता. पण, आता मात्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करता येणार नाही, अशी खंत महंते यांनी व्यक्त केलीय.

‘शिवसेना आणि भाजप युती म्हणून एकत्र लढले असते, तर मला नक्कीच आनंद झाला असता. महायुती तुटायला नको होती’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखंच दिसणाऱ्या विकास महंते यांनी म्हटलंय.

लोकसभा निवडणुकीत महंते यांनी अनेक वाहिन्यांवरील चर्चा सत्रांत मोदींच्या रुपातच सहभागी होऊन भाजपचा प्रचार केला होता. यावेळी, विधानसभेलादेखील असाच धडाका लावायचा अशी त्यांची इच्छा होती. पण... त्यांची ही इच्छा मात्र आता अपूर्णच राहिलीय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.