मुंबई : मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी अखेर आपल्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलाय.
दरेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. प्रवीण दरेकर यांनी आपल्या सरचिटणीसपदाच्या राजीनाम्याचा फॅक्स मनसेच्या मुख्य ऑफिसवर पाठवलाय, तसंच ‘कृष्णकुंज’वर एक प्रत ठेवल्याचंही दरेकरांनी सांगितलंय.
परंतु, कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम करतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. बाळा नांदगावकर यांच्यामुळे आपण हा राजीनामा देत असल्याचंही दरेकरांनी म्हटलंय.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मंगळवारी, 'पक्षाची धोरणं चुकीची नव्हती, तर आमदार कामात कमी पडले' असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी माजी आमदारांवर पराभवाचं खापर फोडलं होतं. यामुळे दरेकर दुखावले गेले होते. त्यामुळे पक्षातल्या दुफळीचं चित्र समोर आलं होतं.
यंदाच्या निवडणुकीत २१९ जागा लढवणाऱ्या मनसेला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे. तर एकूण मतांपैकी मनसेला अवघी ३ टक्के मतंच मिळवता आली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.