भाजपला धक्का; सोनबा मुसळेंचा अर्ज बाद

नागपूर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे उमेदवार  सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द करण्यात आलाय. मुसळे हे भाजपचे सावनेर मतदार संघातले उमेदवार होते. 

Updated: Sep 30, 2014, 12:33 PM IST
भाजपला धक्का; सोनबा मुसळेंचा अर्ज बाद title=

नागपूर : नागपूर भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे उमेदवार  सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द करण्यात आलाय. मुसळे हे भाजपचे सावनेर मतदार संघातले उमेदवार होते. 

'भाजपचे सावनेरचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्यांनी त्याचद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतल्याचा' आरोप करण्यात आला होता. मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी याविषयी लेखी तक्रार नोंदविली होती. सोबतच, मुसळे यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली होती. 

त्यावर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुसळे यांचा अर्ज रद्द केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.