निपाणी: राज्य पुनर्रचनेच्यावेळी बेळगांवसह सीमाभागातील ८६५ खेडी अन्यायानं १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली. या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमाभागात आज काळा दिवस पाळला जातो.
आज बेळगांवसह संपूर्ण सीमाभागात प्रत्येकानं आपले व्यवहार बंद ठेवण्याचं आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनं करण्यात आलंय. त्याचबरोबर निपाणी बंदची सुद्धा हाक देण्यात आलीये. आज दिवसभर मराठी बांधव काळे कपडे,घालून किंवा काळ्या फिती लावून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवणार आहेत.
तर दुसरीकडं आजच्याच दिवशी कर्नाटक सरकार विजयोत्सव दिनाचा कार्यक्रम बेळगांवमध्ये घेवून सीमावासियांच्या जखमेवर मिट चोळण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बेळगांवमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीनं सकाळी नउ वाजता प्रचंड मोठी मुक सायकल फेरी काढली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.