मुक्ताईनगर, जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मुक्ताईनगरमध्ये भाजप नेते एकनाथ खडसेंबर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे मुक्ताईनगर हा भाजप नेते एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ आहे.
खडसेंच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरेंनी एकनाथ खडसेंवर जोरदार प्रहार केले.
खडसेंच्या डोक्यात मस्ती गेली आहे, मी मस्ती आणि माज उतरवायला आलो. भाऊ म्हटलं तर लाथा मारतो म्हणून धडा शिकवायला आलो, असा घणाघात करतांनाच खडसेंमुळंच युती तुटली असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. खडसे युतीचे मारेकरी असून खडसेंचं डिपॉजिट जप्त करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं.
नरेंद्र मोदींनी देश सांभाळावा, राज्य सांभाळण्यासाठी शिवसेना खंबीर आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मोदींना लगावला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बादशहा, शहेनशहा ठरवणार नाही. शेपूट हलवणारा मुख्यमंत्री राज्यात नको, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.