बोअरवेलमध्ये पडला चिमुकला

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. 

Updated: May 1, 2016, 07:34 PM IST
बोअरवेलमध्ये पडला चिमुकला title=

पुणे: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचं काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येतील शितोळे मळ्यात बोअरवेलमध्ये चार वर्षाचा चिमुकला पडला. सुनील हरिदास मोरे असं या मुलाचं नाव आहे. 

काल दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. तब्बल 30 तासांहून अधिक काळ चिमुकल्याला वाचवण्यासाठी एनडीआरएफ, फायर ब्रिगेड, पोलीस प्रशासन, महसूल विभागाचे अधिकारी आणि गावक-यांकडून  मदत कार्य सुरु आहे.

बोअरवेलमध्ये ऑक्सीजनची नळी सोडण्यात आली आहे. बोअरवेलच्या दोन्ही बाजुला खड्डे घेण्यात येतायत. चिमुकला सुनिल आवाजाला प्रतिसाद देतोय. दरम्यान थोड्याच वेळापूर्वी या चुमुकल्याला सलाईन लावण्यात यश आलं आहे.

पण गेल्या 30 तासांपासून सुनिलनं काहीच न खाल्लायानं सुनिलची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.