पुणे : पाचही प्रमुख पक्ष पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवताय. कोणत्याही पक्षांनं अद्याप अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. सर्वच पक्षात उमेदवारांची टंचाई आहे. १६२ जागांसाठी प्रत्येक ठिकाणी सक्षम उमेदवार देण्याची क्षमता कोणत्याचा पक्षाकडे नाही या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी तसेच उमेदवारांची पळवापळावी टाळण्यासाठी सर्व पक्षांनी आपल्या याद्या लांबवल्या आहेत.
काल संध्याकाळपर्यंत पुण्यात एकून ५६ अर्ज दाखल झाले त्यात बहुतांश अपक्ष आहेत. आज किंवा उद्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाण्याची शक्यता आहे. यादी जाहीर न करताच थेट एबी फॉर्म देउन बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे कुणाला डावलले जातंय, कुणाचा पत्ता कट , कुणाला संधी मिळते याबद्दल उत्सुकता आहे. उमेदवारीवरुन सर्वच प्रमुख पक्षात वाद देखील आहे.