औरंगाबाद फटाका आगप्रकरणी पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी निलंबित

औरंगाबाद फटाका आगप्रकरणी महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आलंय. महापालिका आयुक्तांनी रात्री उशिरा ही करवाई केली. 

Updated: Oct 30, 2016, 12:17 PM IST
औरंगाबाद फटाका आगप्रकरणी पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी निलंबित title=

औरंगाबाद : औरंगाबाद फटाका आगप्रकरणी महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन यांना निलंबित करण्यात आलंय. महापालिका आयुक्तांनी रात्री उशिरा ही करवाई केली. 

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आग लागली त्यावेळी फटाका मार्केटमध्ये पाण्याचे टँकर नव्हते. तर फटाका दुकानात जी आग विझवण्याची यंत्र होती ती सुद्धा सदोष होती. ती तपासण्याची जबाबदारी फायर ब्रिगेडची होती. या सगळ्याच ठपका झनझन यांच्यावर ठेवण्यात आलाय. 

दोन दिवसात या प्रकरणात महापालिका अहवाल तयार करुन उर्वरित दोषींवर करवाई करणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय. झनझन यांना निलंबित केल्यावर महापालिक आयुक्तांनी पुन्हा चूक करत तृतीय श्रेणी कर्मचारी आणि स्टेशन इन्चार्ज शैख़ जफ़र यांना महापालिका अग्निशमन दल प्रमुख करण्यात आलं आहे. यावर सत्ताधा-यांनी टीका केलीय.