चंद्रपूर : आपण पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात राहतो की अन्य कुठे असा प्रश्न पडावा असा एक भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात समोर आलाय. आजार घालवण्यासाठी कुमारीकेची नग्न पूजा करुन भोंदूगिरीचा कळस गाठण्याचा प्रकार एका धाडसी तरुणीमुळे समोर आलाय.
शरमेनं माणूसकीची मान खाली घालायला लावणारी एक घटना एका तरुणीच्या धाडसामुळं समोर आली आहे. हे धक्कादायक प्रकरण समोर आलं ते, ही धाडसी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीच्या अचानक झालेल्या भेटीमुळे. तक्रारकर्त्या मुलीची एक मैत्रीण ४ वर्षांनी तिला अचानक भेटली. आमच्या घरी एक महाराज येतो त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तू ये असे निमंत्रण तिच्या मैत्रिणीनं तिला दिलं.
चंद्रपूरच्या सिव्हील लाईन्स या उच्चभ्रू वस्तीत तक्रारकर्ती मुलगी ठरलेल्या वेळी घरी पोहोचली. मात्र तिथे गेल्यावर तिला महाराज आणि पूजा हा सगळा प्रकार विचित्र वाटला. त्यामुळे ही मुलगी तिथून कशीबशी निसटली. तिला परत बोलवण्यासाठी फोनवर विनवण्या सुरु झाल्या. तक्रारकर्त्या मुलीने हा विषय घरी आणि शेजारी सांगितला.
घाबरुन, खचून न जाता याला सामोरं जाण्याचं सर्वांनी तिला बळ दिलं. त्यासाठी फोन रेकॉर्डींग केलं गेलं आणि त्यानंतर समोर आलेल्या माहितीनं सर्वांनाच हादरा बसला. महिलांशी संबंधित आजारावरचा इलाज मंत्र-तंत्र पूजेनं करण्याचं संभाषण रेकॉर्डींगमध्ये नोंदलं गेले.
यासाठी कुत्रा न चावलेली, अंगावर गोंदले गेल्याचे व्रण नसलेली एक कुमारिका निवडायची. तिची नग्न बाबांनी नग्नपूजा करायची. यासाठी लाखो रूपयांचं आमिषही देण्यात आलं.. हे सर्व संभाषण रेकॉर्ड झाल्यावर या मुलीनं पोलिस अधीक्षकांना भेटून तक्रार करण्याचे धाडस दाखवलं.
या प्रकरणी बंगाली जादू करणारा भोंदूबाबा, सावज हेरणारी महिला, तिची मुलगी आणि टोळीतील अन्य एक दुवा असलेली महिला अशा चौघांना अटक करण्यात आलीय, अशी माहिती चंद्रपूर पोलीस अधिक्षक संदिप दिवाण यांनी दिलीय.
शारीरिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अघोरी उपाय आणि भोंदूबाबांचे उंबरठे झिजविणे कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही नक्कीच लाजीरवाणी बाब आहे.
यासाठी कुत्रा न चावलेली, अंगावर गोंदले गेल्याचे व्रण नसलेली एक कुमारिका निवडायची. तिची नग्न बाबांनी नग्नपूजा करायची. यासाठी लाखो रूपयांचं आमिषही देण्यात आलं. हे सर्व संभाषण रेकॉर्ड झाल्यावर या मुलीनं पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करण्याचे धाडस दाखवलं.
पोलिसांनी या प्रकरणी बंगाली जादू करणारा भोंदूबाबा, सावज हेरणारी महिला, तिची मुलगी आणि टोळीतील अन्य एक दुवा असलेली महिला अशा चौघांना अटक केलीये.
शारीरिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अघोरी उपाय आणि भोंदूबाबांचे उंबरठे झिजविणे कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हा पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही नक्कीच लाजीरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.