बुडत्या जहाजात जाणार कोण?- दानवेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस बुडते जहाज असल्यानं आपण तिथं जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असं सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असं प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिलं. 

Updated: Feb 8, 2015, 05:46 PM IST
बुडत्या जहाजात जाणार कोण?- दानवेंचं प्रत्युत्तर title=

नाशिक: काँग्रेस बुडते जहाज असल्यानं आपण तिथं जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही, असं सांगतानाच भाजपाचे आमदार फोडून दाखवा अन्यथा मी काँग्रेसचे आमदार फोडून दाखवतो, असं प्रतिआव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये बोलताना ठाकरे यांना दिलं. रावसाहेब दानवे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले नसते तर ते काँग्रेसमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर उत्तर देतांना दानवे बोलले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं ‘घोषणाबाज सरकारचे १०० दिवस’ अशा आशयाची टीकात्मक पुस्तिका प्रसिद्ध करून सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याची टीका केली. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार आदी उपस्थित होते. गेल्या तीन महिन्यांत राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विरोधात असताना आत्महत्यांना जबाबदार धरून सरकारवर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे आता कुणावर गुन्हा दाखल करणार, सरकारच्या संवेदना संपल्या आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

सोमवारी रास्ता रोको

शेतीमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्यांत झालेली वाढ, मुंबई शहराचे महत्त्व कमी करून गुजरातकडेच विशेष लक्ष आदी प्रश्नांवर भाजपा-शिवसेना युती सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यभर रास्ता रोको करण्यात येणार आहे.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.