धक्कादायक : ५०० रुपयात विकलं कॉलेज तरुणीला

नागपूरमधील गोकुळपेठ भागात एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. यामधून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये एक कॉलेज विद्यार्थिनी अडकली असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात ४ लोकांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Feb 9, 2016, 04:22 PM IST
धक्कादायक : ५०० रुपयात विकलं कॉलेज तरुणीला

नागपूर : नागपूरमधील गोकुळपेठ भागात एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. यामधून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये एक कॉलेज विद्यार्थिनी अडकली असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात ४ लोकांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

500 रुपयात गरीब घरांतील मुलींचा सौदा होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. गरीब आणि कॉलेजच्या तरूणींना फूस लावून या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न होत होता. या प्रकरणात अटक केलेल्या लोकांचं म्हणणं आहे की या कामासाठी त्यांना कमिशन मिळत होतं.

एका गुप्त माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. कारवाई दरम्यान मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.